List of Blogs with Contents

Get this widget

सांग ना असं का केलसं तू

सोबतीचा हात पुढे केलास तू
हात देऊन उंच भरारी शिकवलस तू
असाव्दपणे मधेच हात सोडून गेलास तू
सांग ना असं का केलसं तू

जीवनात हास्य घेऊन आलास तू
आनंद हास्य अंतरी उमटवल तू
आश्रू देऊन हास्य घेऊन गेलास तू
सांग ना असं का केलसं तू

स्वप्न पाहण्याची आवड केलीस तू
स्वप्नात रंग नवीन भरलेस तू
स्वप्न मोडून जागे करून गेलास तू
सांग ना असं का केलसं तू

प्रेमाची जाणीव करून देलीस तू
प्रेम सागरात तुझा ओढ्लेस तू
लाटे द्वारे किनारावर एकट सोडलेस तू
सांग ना असं का केलसं तू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...