List of Blogs with Contents

Get this widget

''प्रेम''

मी खुप काही केल, 
मी खुप काही केल
फक्त तुझ्यासाठी. 

माझ वागन देखिल बदलल 

रागित स्वभाव सोडून, 
शांत स्वभाव केल, 


कारण तुझ्या रागावर माझा राग म्हणजे 
तापलेल्या तव्यावर शिम्पडलेले पानी. 

मी प्युर वेजेटेरियन ची नॉन -वेजिटेरियन झाले, 
त्रास झाला थोडापण केल 
फक्त तुझ्यासाठी. 

पाउस म्हणजे माझा जिव होता पण 
तुला चिखल- पाउस आवडत नाही म्हणून, 
मी पावसात ओल-चिम्ब होणे सोडून दिल आहे, 
फक्त तुझ्यासाठी. 

मी दिलेली वस्तु जपून ठेवायची,अशी माझी ताकीद असायची, 
माझी वस्तु हरवल्यास मी कधी त्या व्यक्तीला 
पुन्हा काही दिले नाही. 

पण मी तुला देत राहिले आणि तू हरवत राहिला, 
आणि तरी मी तुला देतच राहिले. 
फक्त तुझ्यासाठी. 

माझ्या जीवनाच्या शब्दकोशात, 
कधी नसलेला शब्द ''प्रेम '' 
माझ्या हृदयाने कोरुन लिहिला आहे, 
फक्त तुझ्यासाठी. 

मी तुझ्यासाठी मला पूर्ण बदलल, 
पण तू माझ्यासाठी कण भर सुद्दा 
बदलला नाही?? 



आणि हां प्रश्न मी तुला कधीच केला नाही, 
कारण मी तुझ्यावर ''प्रेम'' केल 
फक्त ''तुझ्यावर प्रेम केल''......

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...