List of Blogs with Contents

Get this widget

आई (2)

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते॥


कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते॥

दगडातला तो देवही, आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते॥

ज्‍योति तुळजापुरकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...